• TO BRING PEACE AND HAPPINESS TO ONE LACK FAMILIES BY GIVING THEM FINANCIAL FULFILLMENT THROUGH WEALTH CREATION.


शेअर बाजारात तोटा हा ह्यामुळे होऊ शकतो.

शेअर बाजारात तोटा हा ह्यामुळे होऊ शकतो:

 

१. कुठलाही अभ्यास न करता शेअर्सची केलेली खरेदी.

 

२. मित्र/एजंट/टेले मार्केटिंग वाल्यांच्या टिप्स घेऊन शेअर खरेदी करणे.

 

३. लघु कालीन गुंतवणूक ही बहुदा शेअर बाजारामध्ये तोट्यात घेऊन जाते.

 

४. शेअर मार्केटमध्ये अचानक आलेली तेजी ( कुठल्याही सबळ कारणाशिवाय) ज्या मुळे बहुतांश गुंतवणूकदार प्रॉफिट बुक करायच्या लोभापायी सेलिंग स्प्री ( बेभान विक्री) करतात ज्याचा परिपाक हा संपूर्ण बाजार कोसळण्यात होतो. तुम्ही नेमके त्या वेळेतच तुमच्या समभागाचीची विक्री केली.

 

५. काही मोठ्या घटना/ बातम्या जसे की दहशतवादी हल्ला/ सरकार बदलणे/ सरकार धोरणात काही प्रतिकूल बदल/ जगभरातील मार्केट कोसळणे/ नैसर्गिक आपत्ती ह्या मुळे अचानक बाजार कोसळू शकतो. त्या वेळेस केलेली विक्री ही तोट्यात घेऊन जाते.

 

६. आपल्या पोर्टफोलिओ मध्ये असणारे बहुतांश अथवा संपूर्ण शेअर्स हे अर्थव्यवस्थेच्या एका क्षेत्रातील असतील (overexposure) आणि काही प्रतिकूल परिस्थितीमुळे हे संपूर्ण क्षेत्र underperform करत असेल तर अशा वेळेस धीर सोडुन विक्री केली तर तोटा हा निश्चित.

 

७. आपण खरेदी केलेल्या समभाग ज्या कंपनीचे आहेत त्या कंपनीने अपेक्षित नफा न मिळवणे अथवा काही अपवादात्मक परिस्थितीत ती कंपनीचं बंद पडणे म्हणजे आपली त्या कंपनीतील गुंतवणूक मातीमोल होणे.( उदा. सत्यम कॉम्प्युटर्स)

 

टीप:- अभ्यासपूर्ण गुंतवणूक जी दीर्घकाळासाठी असेल आणि शिवाय आपण वेळोवेळी आपल्या पोर्टफोलिओ मध्ये असलेल्या शेअर्सच्या कामगिरीचा आढावा घेऊन त्याप्रमाणे खरेदी विक्री करत राहिलो आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रातील शेअर्समध्ये गुंतवणक करत राहिलो तर आपली रिस्क आपसूकच कमी होईल आणि आपण सदैव नफ्यातच राहू.

Vikas Deshmukh

Independent Financial Advisor 

Mo:9096446999

For more information click on this link to contact us...

       
Copyright © 2019 wealth-creation.in All rights reserved. | Design By Ultraliant Infotech Pvt. Ltd.