• TO BRING PEACE AND HAPPINESS TO ONE LACK FAMILIES BY GIVING THEM FINANCIAL FULFILLMENT THROUGH WEALTH CREATION.


*अर्थसाक्षरतेच्या दिशेने* सोप्या भाषेत शेअर बाजार

अर्थसाक्षरतेच्या दिशेने

सोप्या भाषेत शेअर बाजार , *गोष्टी सांगेन युक्तीच्या चार : शेअर बाजार*

शेअरबाजारात केलेली गुंतवणूक ही जाणीवपूर्वक धोका स्वीकारून केली जाते. महागाईवर मात करणारा परतावा यातून मिळावा आणि आपली दीर्घकालीन उद्दिष्टे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत ही या मागे इच्छा असते. अंतिमतः आपला फायदाच व्हावा अशी येथे गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकाची अपेक्षा असते. अनेकजण मला मी कोणते शेअर, म्युच्युअल फंडाची कोणती योजना घेऊ ते विचारतात. या प्रत्येकाची सर्व तपशीलवार माहिती माझ्याकडे बहुधा नसते. त्यामुळे त्यांना उपयोगी पडेल अशी माहिती मी त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय देऊ शकत नाही. बाजारात आपण कोणता शेअर कधी आणि कोणत्या भावाने घेणार आणि विकणार यावर आपल्याला होणारा नफा/तोटा निश्चित होतो.

चांगले शेअर घ्यावेत हे सर्वमान्य आहे. यासाठी अभ्यास करावा लागतो आणि त्याला पर्याय नाही. याशिवाय आपल्याकडे किती पैसे आहेत? ते कधी हवे आहेत? किती परतावा अपेक्षित आहे? आपण किती जोखीम घेऊ शकतो? किती झटपट आणि अचूक निर्णय घेऊ शकतो? यासारख्या अनेक गोष्टींवर ते अवलंबून आहे. चांगले शेअर कोणते? ते कसे शोधावे? यासाठी कोणते मार्ग आहेत ज्यामुळे आपले नुकसान होणार नाही यावर विचार करुयात.

१. शेअर मार्केटच्या अभ्यासासाठी इंग्रजीत अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. याशिवाय NISM/BSE/NSE यांचे विविध विषयावरील प्रमाणपत्रांचे अभ्यासक्रम अल्पखर्चात उपलब्ध आहेत, त्यावर पुस्तके उपलब्ध आहेत. त्यांची माहिती सदर संस्थांच्या संकेतस्थळांवर आहे .मराठीत ज्याला शेअर बाजाराची गीता असे म्हणता येईल असे 'शेअर बाजार, जुगार छे! बुद्धीबळाचा डाव' हे रवींद्र देसाई यांनी लिहिलेले पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये देसाई यांनी चांगली कंपनी कशी शोधायची यासाठी excel sheets मध्ये कोणत्या माहितीचे संकलन करुन त्याचे विश्लेषण कसे करावे हे सविस्तर सांगितले आहे. शेअरचे भाव अनेक कारणांनी वाढतात/कमी होतात, परंतु कंपनीच्या चांगल्या कामगिरीवरून टिकून राहतात, स्थिर होतात आणि अंतिमतः वाढतात.

२. Moneycontrol, mutulfundonline, bseindia, nseindia यांच्या संकेतस्थळावर गुंतवणूकदारांना उपयुक्त शेअर आणि म्युच्युअल फंड याविषयी बरीच माहिती उपलब्ध आहे. म्युच्युअल फंडाचे टॉप रँकिंग आणि टॉप परफॉर्मिंग असे दोन प्रकारांत वर्गीकरण केले जाते. त्यांचे टॉप होल्डिंग पाहायला मिळते, त्यांनी निवडलेले स्टॉक या नेहमी चांगल्याच कंपन्या असतात.

३. सीसीपी ( Coffee can portfolio) या तंत्राने अनेक फंड हाऊस, वित्तसंस्था त्यांनी शोधलेले चांगले शेअर्स जाहीर करतात. ही माहिती आपणास गुगलवरून सहज उपलब्ध होते. ते तपासून उपलब्ध माहिती पडताळून पाहावी.

४.शेअरबाजार या विषयाची अनेक मासिके आणि स्वतंत्र चॅनेल आहेत. यावर लक्ष ठेवून आपले मत बनवावे. यांचे मालकी हक्क विविध उद्योग समुहाकडे असल्याने यातून निष्पक्षपाती माहिती मिळेलच असे नाही याची जाणीव ठेवावी. माझ्याकडे गेले २० वर्षे कॉर्पोरेट इंडिया हे पाक्षिक येते. त्यांनी सुचवलेले शेअर वर्षभरात उत्तम रिटर्न देतात असा अनुभव आहे. मात्र माझ्याकडे पाक्षिक येईपर्यंत त्यांनी सुचवलेल्या किमतीच्यावर शेअरचा भाव नेहमीच गेलेला असतो. अशावेळी मी तो भाव लिहून ठेवून त्याच्या जवळपास अथवा खाली भाव येण्याची वाट पाहून मगच तो शेअर खरेदी करतो.

५. एक वर्षानंतर शेअरविक्रीतून मिळालेला एक लाख रुपयांचा नफा पुर्णपणे करमुक्त आहे. यामुळे आपल्याजवळ असलेले आणि चांगला भाव मिळू शकणारे शेअर अनेकजण तसेच ठेवतात. यावर फक्त १५% कर द्यावा लागतो. तेव्हा गुणवत्तेवर हे शेअर ठेवावे की लगेच विकावे याचा निर्णय घ्यावा. फक्त कर भरावा लागेल की नाही एवढाच विचार करू नये.

६. वर्षभरात किमान दोन वेळातरी काहीतरी घबराट होऊन शेअर मार्केट खाली येते. ही वेळ उत्तम शेअर खरेदी करायची अनमोल संधी असते. संधीसाधू होऊन त्याचा लाभ घ्यावा. अल्पकाळात उत्तम रिटर्न मिळू शकतो.

७. आपल्याला किती रिटर्न मिळतो आहे हे त्वरित काढता येणे जरुरीचे आहे, म्हणजे निर्णय त्वरित घेता येतो. प्ले स्टोरवरून financial calculation हे एप्लिकेशन डाऊनलोड करुन घ्यावे. यात सिंपल आणि कम्पाउन्ड इंटरेस्ट काढाता येते.

८. भाव कमी आहे एवढ्याच निकषावर कोणाताही शेअर खरेदी करू नये. फायदा होणे महत्वाचे आहे. नाहीतर मोठ्या प्रमाणात रक्कम अडकून राहू शकते किंवा नुकसानही होऊ शकते.

९. डे ट्रेडिंग/फॉरवर्ड ट्रेडिंग आपल्याकडे असलेल्या पूर्ण पैशाएवढे करावे. जास्त मिळणारे एक्पोजर टाळावे. कर्ज घेऊन खरेदी करू नये.

बाजारात आपल्याला शेअरचे भाव दिसत असतात. त्याचे मूल्य शोधून काढायचे असते. अनुभव आणि ज्ञान या साहाय्याने ते आपल्याला जमू शकते. व्यवहारज्ञान हे येथील भांडवल असून त्याला अभ्यास आणि विश्लेषण

यांची जोड मिळावी. तेव्हा समृद्ध व्हा आणि शेअरवरील आपले अनुभव शेअर करा !

(या लेखात उल्लेख असलेले पुस्तक, संकेतस्थळे, पाक्षिक, एप्लिकेशन यांच्याशी लेखकांचा कोणाताही व्यावसायिक संबंध नाही. शेअर, म्युच्युअल फंड यातील गुंतवणूक ही धोकादायक प्रकारात मोडत असून यासंबंधात कोणतीही शिफारस नाही. तज्ञांकडून योग्य ती माहिती घेऊनच आपली गुंतवणूक करावी.) 

आधिक महितीसाठी

Don't work for money, Let's make money work for you….

Vikas Deshmukh

Independent Financial Advisor 

Mo:9096446999

For more information click on this link to contact us...

       
Copyright © 2019 wealth-creation.in All rights reserved. | Design By Ultraliant Infotech Pvt. Ltd.